शहांचा प्रचार सभांचा धडाका, परळीनंतर चिखलीत महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा

2770

विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तसा प्रचार सभांचा धडाका सुरू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभा घेत आहेत. मंगळवारी अमित शहा हे भगवानबाबा भक्तीगडावर गेले होते. येथून त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. आता अमित शहा हे बुलढाणा जिल्ह्यात येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या 7 उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा चिखली येथे येत आहेत. जाफराबाद मार्गावरील खबुतरे ले-आऊटमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता अमित शहा यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे देखील या सभेला संबोधित करणार आहेत.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

बुलढाणा जिल्ह्यात डॉ. संजय कुटे (जळगाव जामोद), आमदार चैनसुख संचेती (मलकापूर), आमदार आकाश फुंडकर (खामगाव), श्वेताताई महाले (चिखली) तर शिवसेनेचे आमदार डॉ. संजय रायमुलकर (मेहकर) आमदार डॉ. शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा) व संजय गायकवाड (बुलढाणा) हे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा चिखली येथील सभेत करणार आहेत.

Photo – महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते

जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटवण्याच्या ऐतिहासिक कामगिरीत महत्वाची भूमिका साकारणारे धाडसी गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी जगभरात ख्याती प्राप्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी असलेले शहा राष्ट्रीय राजकारणात दिग्गज रणनीतीकार म्हणून देखील ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या सभेला जिल्ह्यातील सर्व मतदार संघातून भाजपा-शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते आणि मतदारांची अलोट गर्दी उसळणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 3239 उमेदवार, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार

भाजप आणि शिवसेना उमेदवारांच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी आयोजित केलेल्या या सभेमध्ये अमित शहा यांच्या बरोबर भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे या देखील या सभेत आपले विचार मांडतील. याशिवाय खासदार प्रतापराव जाधव आणि भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांच्यासह महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील भाजपा, शिवसेना, रिपाई, रासप, रयत क्रांती संघटना व शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनींनी या सभेला मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थित राहावे अशी विनंती महायुतीतर्फे करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या