बिग बी वेबसीरिजमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अमिताभ बच्चन

महानायक बिग बी लवकरच वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता अनेक कलाकार वेबसिरीजकडे वळताना दिसत आहेत. मध्यंतरी डिजिटल विश्वात पदार्पण करण्याची इच्छा स्वतः बिग बींनी व्यक्त केली होती. एखाद्या चांगल्या वेबसीरिजमध्ये काम करायला मिळाले तर नक्की आवडेल असे बिग बी म्हणाले होते. त्यानंतर एका बडय़ा डिजिटल मंचाने बिग बींना वेबसीरिजची ऑफर दिल्याची माहिती आहे.