
देशभरात कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो प्रवासी मजूर वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकले आहे. आतापर्यंत राज्य सरकारने लाखो मजूरांना बस ट्रेनने त्यांच्या घरी पाठवले. आता या मजूरांच्या मदतीसाठी अमिताभ बच्चन देखील धावून आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी अनेक मजूरांना चार्टड फ्लाईटने उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी पाठवले आहे.
अमिताभ बच्चन यांची कपंनी एबी कॉर्पोरेशनने सहा विमानांची सोय केली असून आतापर्यंत तीन विमानातून मजूर रवाना झाले आहेत. बुधवारी सकाळी दोन व दुपारी एक विमान सो़डण्यात आले. एबी कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेश यादव यांनी ही माहिती दिली. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. याआधी एबी कॉर्पोरेशनतर्फे दहा बस उत्तर प्रदेशसाठी रवाना झाल्या आहेत. या कामात एबी कॉर्पोरेशनतर्फे माहिम दरगाह ट्रस्ट व हाजिअली ट्रस्टही काम करत आहे.
येत्या 12 जूनला अमिताभ बच्चन यांना गुलाबो सिताबो हा चित्रपट अॅमेझॉनवर रिलीज होणार आहे. या चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबत आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.




























































