बिग बी ठरले देशातील सर्वात विश्वसनीय सेलिब्रेटी! टियारा आणि आयआयएचबीचा अहवाल

सिनेमासह सामाजिक उपक्रमांत अमूल्य योगदान देणारे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन देशातील सर्वात विश्वसनीय सेलिब्रेटी ब्रॅण्ड ठरले आहेत. टियारा आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ह्युमन ब्रॅण्डसने (आयआयएचबी) नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार हे पुढे आले आहे.

देशातील 23 शहरांतील 60 हजार लोकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता. विविध क्षेत्रांतील एकूण 180 सेलिब्रेटींबाबत हे सर्वेक्षण करण्यात आले होते. 88 स्कोर मिळवत बिग बी यांनी सर्वाधिक विश्वसनीय सेलिब्रेटी म्हणून बाजी मारली आहेत. या यादीत 86.8 स्कोर मिळवत अक्षय पुमार दुसऱ्य़ा क्रमांकावर तर 82.8 स्कोर मिळवत अभिनेत्री दिपिका पदुकोण तिसऱ्य़ा क्रमांकावर आहे. टीव्ही सेलिब्रेटींमध्ये कॉमेडियन कपील शर्मा आणि भारती सिंगने तर क्रीडा क्षेत्रात महेंद्रसिंग धोनीने या यादीत स्थान पटकावले आहे.

हार्दिक पंडय़ा वादग्रस्त सेलिब्रेटी 

टियारा आणि आयआयएचबीच्या या सर्वेक्षणानुसार देशातील सर्वात वादग्रस्त सेलिब्रेटींमध्ये क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ा टॉपवर आहे.करण जोहर आणि मलायका अरोरा वादग्रस्त टीव्ही सेलिब्रेटी तर रणबीर कपूर आणि आलिया भट वादग्रस्त सेलिब्रेटी कपल्स ठरले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या