अमिताभ बच्चन यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर

1181

हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशहा, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या बहुमुल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टि्वटवर दिली आहे. प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. असेही जावडेकर यांनी म्हटले आहे.

‘अमिताभ बच्चन यांनी गेल्या दोन पिढ्यातील लोकांचे मनोरंजन केले आणि त्यांना प्रेरित केले. याबद्दल त्यांची एकमताने दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे देशातील आणि विदेशातीलही त्यांचे चाहते आनंदी आहेत. मी देखील त्यांचे अभिनंदन करतो’, असे ट्वीट माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

अमिताभ बच्चन यांना चित्रपट सृष्टीतील मानाचा पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही अमिताभ बच्चन यांचे अभिनंदन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या