
70 वा साऊथ फिल्मफेअर ऍवॉर्ड्स सोहळा केरळच्या कोच्ची शहरात रंगला. अमिताभ बच्चन यांना तेलुगु भाषेतील ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टींग ऍक्टरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अमिताभ बच्चन यांचा हा पहिला साऊथ फिल्मफेअर आहे. ‘कल्की’ चित्रपटात त्यांनी भीष्माचार्यची भूमिका साकारली आहे. या सोहळ्यात तेलगु, तामिळ, मल्याळम आणि कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांना सन्मानित करण्यात आले.
‘कल्कि 2898 एडी’ चित्रपट 27 जून 2024 रोजी प्रदर्शित झाला होता. याने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवत जगभरात 1,000 कोटींहून अधिक कमाई केली होती. अमिताभ बच्चन पुरस्कार सोहळ्याला उपस्थित नव्हते. ‘पुष्पा 2’ चित्रपटाने तेलुगू श्रेणीत पाच पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सुकुमार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि अल्लू अर्जुन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला.




























































