‘या’ अभिनेत्याच्या पदार्पणामुळे अमिताभही धास्तावले

सामना ऑनलाईन । मुंबई

स्टार ऑफ द मिलेनियम अशी बिरुदावली असणारे बिग बी अमिताभ बच्चन यांचं अभिनय कौशल्य ही वादातीत बाब. 76 वर्षं वयातही त्यांचा उत्साह आणि अभिनयातलं वैविध्य अनेकांना प्रेरणादायी आहे. पण हेच बिग बी सध्या एका अभिनेत्या पदार्पणामुळे चांगलेच धास्तावले आहेत. त्यांनी ट्वीट करून तसं स्पष्टंही केलं आहे.

हा अभिनेता म्हणजे रंगीला, सत्या, कंपनी, भूत, सरकार अशा गाजलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा. आगामी ‘कोब्रा’ या चित्रपटात तो एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या सिनेमाचं पोस्टर बिग बी यांनी शेअर करून रामूचं अभिनंदन केलं आहे. सोबत आता आपल्याला तगडी स्पर्धा निर्माण झाल्याचंही बिग बींनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या