
गेल्या आठ दिवसापासून अमरावती जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाचा वेग पुर्णपणे मंदावला आहे. दरम्यान आज आलेल्या अहवालात पुन्हा 78 कोरोनाबाधित आढळुन आले असून त्याची संख्या जिल्ह्यात 15 हजार 599 वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे जिल्ह्यात 351 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला.
यापूर्वी दैनंदिन 200 ते 400 पर्यंत कोरोनाबाधितांचे रुग्ण आढळून येत होते. आता मात्र ही संख्या 100 च्या आत आली. त्यामुळे ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक आहे. यासोबतच रुग्ण दुरुस्त होण्याचे प्रमाण 90.55 आहे. मृत्यूदर 2.1 असून डबलिंग रेट 92.2 वर गेला आहे. सध्या गृहविलगीकरणात 305 रुग्ण असून महापालिका क्षेत्रात 228 रुग्ण गृहविलगीकरणात आहे.





























































