
दोन खुनांच्या घटनामुळे अमरावती शहर हादरले आहे. राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आदर्श नगरात पूजा राठोड नामक महिलेची कौटुंबिक वादातून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पूजाचा पती विजय राठोड याला अटक करण्यात आली आहे.
दुसरी घटना यशोदा नगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या यशोदा नगरमधील गल्ली नं. 4 मध्ये दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली. क्षुल्लक कारणावरूनच 17 वर्षीय अनिकेत ज्ञानदेव कोकणे याचा खून करण्यात आला. या प्रकरणात अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.






























































