अमरावती – जिल्हा बँकेवर कब्जा यशोमती ठाकूर यांचा कब्जा, सुलभा खोडकेंचे पती संजय खोडके पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी सहकार पॅनलने विराेधी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवित बॅंकेवरील सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत सहकार पॅनेलचे 12, परिवर्तन पॅनलचे 4 तसेच 1 अपक्ष उमेदवार निवडून आले. यापुर्वी चार जण बॅंकेच्या संचालकपदी बिनविराेध निवडून आले आहेत.

आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा 6 मतांनी पराभव केला आहे. मात्र त्याच वेळी संजय खोडके यांच्या मतदार संघातून बबलू देशमुख विजयी झाले आहेत. बबलू देशमुख यांनी सुरवातीला 2 मतदार संघातून उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी बबलू देशमुख चांदुर बाजार मतदार संघातून पराभूत झाले. मात्र इतर मागासवर्गीय मतदार संघातून बबलू देशमुख यांनी आमदार पती संजय खोडके यांना पराभूत केले. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 पैकी 17 जागांसाठी सोमवारी मतदान झाले. मंगळवार सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातच सहकार पॅनलचे एकेक उमेदवार विजय मिळवू लागल्याने यशाेमती ठाकूर यांच्या गाेटात उत्साहाचे वातावरण हाेते. त्यानंतर परिवर्तन पॅनलचे उमेदवार बच्चू कडू यांनी सहकार पॅनलच्या बबलू देशमुख यांचा पराभव केल्याने सहकार पॅनलचे समर्थकांत शांतता पसरली. एकेक निकाल हाती येऊ लागताच त्या गटाचे सर्मथक जल्लाेष करीत हाेते.

या निवडणुकीत राज्याचे दोन मंत्री एकमेकांसमोर उभे ठाकल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे सहकार पॅनल आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे परिवर्तन पॅनल या दोन प्रमुख पॅनलमध्ये ही निवडणूक रंगली.

अपेक्षेप्रमाणे सहकार पॅनलने 15 विरुद्ध 05 असा परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडिवला. परिवर्तन पॅनलमधून निवडणूक लढविणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समवेत अन्य चाैघांनी बॅंकेत प्रवेश केला आहे. दरम्यान, या मतमाेजणीनंतर जल्लाेष करण्याच्या कारणावरुन पाेलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार

  • सुनील वऱ्हाडे (अमरावती)
  • वीरेंद्र जगताप (चांदूर रेलवे)
  • हरिभाऊ मोहोड (भातकुली)
  • दयाराम काळे (चिखलदरा)
  • श्रीकांत गावंडे (धामनगाव रेल्वे)
  • सुधाकर भारसाकळे (दर्यापुर)
  • प्रकाश काळबांडे (क 2 पतसंस्था मतदारसंघ)
  • बलवंत वानखड़े (एससी/एसटी मतदारसंघ)
  • बबलू देशमुख (ईतर मागास वर्ग मतदारसंघ)
  • बालासाहेब अलोने (ब 4 विमुक्त जाती मतदारसंघ)
  • सुरेखाताई ठाकरे (महिला मतदारसंघ)
  • मोनिका मार्डीकर (महिला मतदारसंघ)

    परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार

  • बच्चू कडू (चांदूर बाजार)
  • अजय मेहकरे (अंजनगाव सुर्ज़ी)
  • चित्रा डहाणे (मोर्शी)
  • रविन्द्र गायगोले (क1 – वैयक्तिक भागधारक मतदारसंघ)
  • अपक्ष विजयी उमेदवार
  • आनंद काळे (अचलपुर)

बिनविरोध

  • नरेशचंद्र ठाकरे (वरुड)
  • अभिजीत ढेपे (नांदगांव खंडेश्वर)
  • श्री साबळे (तिवसा)
  • जयप्रकाश पटेल (धारणी)