प्रेमप्रकरणातून तरुणीची गार्डनमध्ये भोसकून हत्या, तरुणाने स्वतःलाही भोसकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

अमरावतीत तरुणाने प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला चाकू भोसकून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू भोसकून घेतला आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणिता कोंबे असे प्रेमप्रकरनातून हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रणिता ही जुना धामणगाव येथील रहिवासी असून ती धामणगाव मधील सेफला हायस्कूल मध्ये 12 वीत शिकत आहे. सोमवारी सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान शाळेत जात असताना एका तरुणाने गार्डनमध्ये नेऊन तिच्या पोटात चाकूने सपासप वार केले. यानंतर या तरुणाने स्वताच्या पोटात चाकू मारून स्वतःला संपवन्याचा प्रयत्न केला. यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलीस याबाबत अधिक माहिती घेत आहेत.