अमरावतीत रानडुकरांचा शेतकऱ्य़ांवर हल्ला, तीनजण जखमी

अमरावती जिल्ह्यात पिकाची पाहणी करायला गेलेल्या शेतकऱ्य़ांवर रानडुकराने हल्ला केला आहे.  त्यात तीन जण जबर जखमी झाले आहेत. या भागातील शेतकरी हरिण, वानर आणि डुकरांसारख्या वन्यप्राण्यांमुळे त्रस्त आहेत.

दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील धनराज गावंडे, विकास तिडके, प्रेमदास भगत हे आपापल्या शेत शिवारात मध्ये पिकाची पहाणी करिता गेले होते. तेव्हा धनराज गावडे याणच्यावर रानडुकरांनी हल्ला केला. त्याच बाजूला असलेला एक शेतकरी त्यांच्या मदतीला धावून आला आणि गावडे यांची रानडुकरांच्या तावडीतून सुटका करून घेतली.

विकास तिडके आपल्या शेतांमधून परत येताना प्रमोद वांदे यांच्या शेताजवळ रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला केला. तिडकेनी कसाबसा पळ काढून आपले प्राण वाचवले. तर रामा गड येथील प्रेमदास भगत त्यांच्यावर सुद्धा शेतामध्ये रानडुकराने हल्ला करून जखमी केले. घटनेचा पंचनामा करण्याकरिता दर्यापूर येथील वनपाल डी. बी. सोळुंके,  वनरक्षक आर. बी. धुमाळे बी आर खांडेकर हे जखमी शेतक-यांच्या घरी जाऊन त्यांची पाहणी करून पंचनामा केला.

येवदा शेत शिवारात दिवसेंदिवस शेतकऱ्य़ांना रानडुकरांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. शेतकरी महागड्या भावाने बी बियाणे विकत घेऊन आपल्या शेतामध्ये पेरणी करीत असता रान डुक्कर पेरलेले बियाणे फस्त करतात. सध्या शेतकरी नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आहे, त्यातच या परिसरातील रानडुक्कर, हरिण, नीलगाय वानर यासारखे प्राणी शेतकऱ्य़ांना हैराण करून सोडत आहे. या परिसरातील रानडुकरांवर आळा बसण्याकरिता शासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी शेतकरी वर्गामध्ये होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या