
सामना ऑनलाईन । अमृतसर
हिंदुस्थानच्या सीमा शुल्क विभागाने आज अटारी सीमेवर ट्रकमधून आणलेले तब्बल 532 किलो हेरॉईन जप्त केले. याची आंतरराष्ट्रीय बाजारात 2700 कोटी रुपये इतकी किंमत आहे. हा ट्रक पाकिस्तानातून आला होता. सीमा शुल्क विभागाच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
अटारीवरील ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’वर ट्रक ताब्यात घेण्यात आला. यात मिठाच्या शेकडो पिशव्या होत्या. त्यात 532 किलो हेरॉईनसह 52 किलो मिश्र मादक पदार्थ लपवले होते. आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटित मादक पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करू शकलो, असे सीमा शुल्क विभागाच्या आयुक्तांनी सांगितले.
—


























































