Pulwama Attack अलिगढ विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची आक्षेपार्ह पोस्ट, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aligarh-muslim-university

सामना ऑनलाईन । लखनौ

पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या भयंकर हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने या हल्ल्यावरून आक्षेपार्ह ट्वीट करत जैश-ए-मोहम्मदची स्तुती केली होती. याप्रकरणी बसीम हिलाल असे नाव असलेल्या विद्यार्थ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच विद्यापीठाने हिलाल याला निलंबित केले आहे.

बसीम हिलाल याने काल पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या ‘HIGH ON JOSH’ या घोषवाक्याची मोडतोड करून ‘HIGH ON JAISH (E MOHMMAD)’ असे ट्वीट केले होते. या ट्विटवरून त्याने जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्याला झालेला आनंद व्यक्त केला. काही वेळाने त्याच्या आक्षेपार्ह ट्वीटमुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्याचे अकाऊंट ट्विटरने बंद केले. बसीम हिलाल हा बीएसएस्सीचा विद्यार्थी असून त्याला विद्यापीठ परिसरात येण्यावरून देखील बंदी घातली आहे.