कालिना – महायुतीसाठी सोपा पेपर!

1266

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कालिना मतदारसंघात 2014 साली शिवसेनेचे संजय पोतनीस निवडून आले. कुर्ल्यातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकासक आणि जमीनमालक यांच्यातील वाद मिटवणे,  डोंगराळ भागात संरक्षक भिंतीची उभारणी, 2500 शौचालयांची बांधणी, मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण अशी अनेक विकासकामे करत पोतनीस यांनी कलिनाचा ‘मेकओक्हर’ केला आहे. सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू वस्तीत त्यांची लोकप्रियता असून कालिनात पुन्हा भगवाच फडकणार असे चित्र आहे.

मतदारसंघाची पार्श्वभूमी

2009 साली पुनर्रचना झाल्यानंतर वाकोला नाला ते कुर्ला स्टेशन अशी कालिना विधानसभा मतदारसंघाची रचना करण्यात आली. 2009 साली काँग्रेसचे कृपाशंकर सिंह येथून निवडून आले होते. 2014 साली शिवसेनेने नगरसेवक संजय पोतनीस यांना येथून उमेदवारी दिली. ऐनकेळी उमेदवारी मिळूनही पोतनीस यांनी दणदणीत विजय मिळवला. यंदा महायुती झाल्याने शिवसेना, भाजप, रिपाइं कार्यकर्ते येथे एकदिलाने काम करीत आहेत. काँग्रेसने जॉर्ज अब्राहम यांना येथून उमेदवारी दिली आहे. 2007 साली महापालिका निवडणुकीत पोतनीस यांनी त्यांचे डिपॉझिट जप्त केले होते. दुसरीकडे मनसेने नगरसेवक संजय तुर्डे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु कॉर्ड क्रमांक 165 आणि 166 मधील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने स्थानिकांचा त्यांच्याविरोधात रोष आहे.

विकासकामांचा डोंगर

विमानतळाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीवासीयांना विविध सुविधा पुरवणे, एसआरएच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देणे, कालिना-कुर्ल्यातील गावठाणांमध्ये सुनियोजित कामे करणे, विमानतळानजीकच्या मिलिंद नगर, गावदेकी परिसरातील 2800 झोपडीधारकांची पात्रता निश्चित करून घेतली असून रहिवाशांचे स्थलांतर लवकरच विद्याविहार येथे होणार आहे, ज्येष्ठांसाठी उद्याने,  2500 शौचालयांची उभारणी, डोंगराळ भागात संरक्षक भिंत अशी अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत. वाकोला एअर इंडिया कॉलनी, शास्त्री नगरसारख्या सखोल भागात पाणी साचणे, एस. जी. बर्वे मार्गावरील वाहतूककोंडी,  डोंगराळ वस्तीतील कमी दाबाने पाणीपुरवठा या समस्यांच्या दृष्टीनेदेखील योजना आखल्या आहेत. मिठी नदीचे रुंदीकरण, सुशोभीकरणासाठीदेखील त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

ऐतिहासिक गांधी मैदानाने घेतला मोकळा श्वास

कुर्ला येथील ऐतिहासिक गांधी मैदानाकर समाजकंटकांनी अनधिकृत बांधकाम केले होते. कोर्टाच्या आदेशानंतरही 15 वर्षे येथील बांधकाम हटकण्याची कुणीही हिंमत दाखवली नाही. कुर्ल्यातील ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पोतनीस यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा करून या मैदानावरील अनधिकृत बांधकाम हटवली आहेत.

कालिना विधानसभा

पुरुष     –           1,28,732

महिला –           1,08,905

तृतीयपंथी         – 5

एकूण मतदार   – 2,37,642

वाढता पाठिंबा

मनमिळावू स्वभाव, दांडगा जनसंपर्क, सहज उपलब्धता, विभागातील जनतेच्या प्रश्नांची जाण ही पोतनीस यांची जमेची बाजू आहे. हिंदूंसह जैन, गुजराती, कुंचीकोरके, ख्रिश्चन, मुस्लिम आणि आंबेडकरी जनतेचा त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या