हिंदुस्थानी प्रजासत्ताक दिन आनंद कुमार यांना अमेरिकेचे खास आमंत्रण

474

हिंदुस्थानचा प्रजासत्ताक दिन हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन नागरिक (एनआरआय) न्यूयॉर्कमध्ये मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा करतात. यावेळी मोठी रॅलीही काढली जाते. हिंदुस्थानातील अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. यावेळी मान्यवरांसह गणितज्ञ आनंद कुमार यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

आनंद कुमार यांच्यावरील ‘सुपर 30’ सिनेमामुळे त्यांनी सुरू केलेले काम लोकांसमोर आले. गरीब, वंचित, उपेक्षित मुलांना ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळावा यासाठी ते दरवर्षी 30 मुलांची विनामूल्य शिकवणी घेतात. ‘शिक्षण क्षेत्रात त्यांनी सुरू केलेले हे काम फक्त हिंदुस्थानी नाही तर जगभरातील हिंदुस्थानींची मान उंचावणारी आहे. तसेच आमची संघटना 50 वर्षे पूर्ण करत आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना निमंत्रित केले आहे’ असे अमेरिकेतील फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या