मास्कने केली आनंद महिंद्रांची बोलती बंद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बऱयापैकी सक्रिय असतात. अनेकदा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते मजेशीर गोष्टी शेअर करताना दिसतात. नुकतेच त्यांनी मास्कचे फोटो शेअर केले आहे. या मास्कवर ’लडकेवाले’ आणि ’लडकीवाले’ असे लिहिलेले दिसत आहे. हे फोटो शेअर करून आनंद महिंद्रा म्हणाले, ’मला माहित नाही हे बघून मी खुश होऊ की घाबरू. खरंच या मास्कने माझी बोलती बंद केली आहे.’ या मास्कवरून आपण अंदाज लावू शकतो की, लग्नसोहळ्यासाठी कशा पद्धतीने मास्क डिझाइन केले जातात. वधू आणि वर पक्षाची मंडळी ही मास्क घालणार आहेत. कोरोनाच्या काळात लग्नसोहळे होत आहेत. पण त्यातही योग्य ती काळजी घेऊन कार्यक्रम पार पडले जात आहेत. आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर अगदी मजेशीर कमेंट्स केले जात आहेत. काहींनी तर लग्नपत्रिकेसोबत सॅनिटाइझर वाटत असल्याचे देखील सांगितले आहे.