मॉडेलचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी व्यावसायिकास अटक

सामना ऑनलाईन । मुंबई

मॉडेल -अभिनेत्रीचा (28) लैंगिक छळ केल्याप्रकरणी अंधेरीतील एका व्यावसायिकास ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. अमित अग्रवाल (35) असे त्याचे नाव आहे.

अमित यांना 14 एप्रिल रोजी अटक करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून अमितने ब्लॅकमेलिंग करत आपला लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने तक्रारीत केला आहे.

मूळ उत्तर प्रदेशची असलेली ही पीडित तरुणी एका कार्यक्रमासाठी मुंबईत आली होती. तिथे तिची ओळख अमितबरोबर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली व ते लिव्ह इन मध्ये राहू लागले. पण 2017 साली अमितच्या मोबाईलमध्ये तिला त्या दोघांचा एमएमएस दिसला. जो बघून तिला चक्कर आली. त्यानंतर काही दिवसांतच अमितचे तिच्याशी पटेनासे झाले. दोघांमध्ये वाद वाढू लागला. नंतर अमित वरचेवर तिला मारहाण करू लागला एवढेच नाही तर त्याच्याजवळील एमएमएस घरातल्यांना दाखवीन अशी धमकी देऊ लागला. यामुळे रोज रोजच्या या त्रासाला कंटाळल्याने पीडिता आपल्या घरी उत्तर प्रदेशमध्ये निघून गेली. तिथे तिचा एका वकीलाबरोबर साखरपुडाही झाला. त्यानंतर ती पुन्हा मुंबईत आली. यावेळीही अमितने धमक्या देत तिच्यावर लैंगिक आत्याचार केले.

आपली प्रतिक्रिया द्या