
सामना प्रतिनिधी । मुंबई
महिनाभरापासून बंद असलेल्या अंधेरी पूर्व येथील मुंबई केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलची ‘घंटा’ शुक्रवारी पुन्हा वाजली. अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने शाळेला नोटीस बजावली होती. ही शाळा तीन आठवडे बंद होती, पण आता पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच वर्ग भरून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे.
केंब्रिज इंटरनॅशनल शाळेकडे अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नक्हते. त्यामुळे महापालिकेने नोटीस पाठवून शाळेचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित केला. अशा परिस्थितीतही शाळेमध्ये दहावीचे विद्यार्थी शिक्षण घेत होते, तर इतर इयत्तांचे विद्यार्थी सक्तीच्या रजेवर होते. किद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांना संपूर्ण पाठिंबा देत शिकसेना संघटक कमलेश राय यांनी शाळेबाहेर पाच दिवस धरणे आंदोलन केले होते. महापौर किश्वनाथ महाडेश्वर आणि आमदार ऍड. अनिल परब यांनी शाळा क्यकस्थापनाशी चर्चा करून ही शाळा तत्काळ सुरू केली.
तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनीही शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी पालिका अधिकार्यांशी संपर्क साधून शाळेचे बंद असलेले वीज-पाणी कनेक्शन पुन्हा सुरू केले. याप्रसंगी स्थानिक भाजप आमदार पराग अळवणी, भाजपचे महामंत्री अमरजीत मिश्र, नगरसेवक सुनील यादव आदी उपस्थित होते. केंब्रिज स्कूल पुन्हा सुरू करावे, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत होती. त्यानंतर शुक्रवारपासून शाळा नियमित सुरू झाली.

























































