
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे गणरायाच्या आगमनाची धामधूम सुरू आहे. गणपती बाप्पाच्या मोठमोठ्या मंडळांबाहेर आता गणेशभक्तांच्या रांगा लागणार आहेत. दरम्यान एका गणपती मंडळांने बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी ड्रेसकोड जारी केला आहे.
View this post on Instagram
गणेशोत्सवाला केवळ एक दिवस शिल्लक असताना मुंबईतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या अंधेरीचा महाराजा या मंडळाने बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिलांनी शॉर्टस, स्कर्ट आणि पुरूषांनी हाफ पँट घालू नये असे आवाहन केले आहे. 14 वर्षांवरील सर्व भक्तांना हा नियम लागू होणार आहे. हा नियम सांगणारे माहिती फलक आझाद नगर परिसरात लागले आहेत. गेल्या वर्षी पासून या मंडळाने हा नियम सुरू केला आहे.























































