स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा उंच असेल आंध्रचे विधानभवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैद्राबाद 

आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये निर्माण होणारे विधानभवन हे स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा मोठे असेल. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तशी घोषणा केली असून विधानभवनाची डिझाईनही फायनल करण्यात आली आहे. या विधानभवनाची ऊंची २५० मीटर असेल. विधानभवनाची ही इमारत सरदार पटेलांच्या इमारतीहून ६८ मीटर ऊंच असेल. नोव्हेंबरअखेर या प्रकल्पासाठी टेंडरही मागवण्यात येणार आहेत.

या प्रकल्पासाठी ब्रिटिश आर्किटेक्ट संस्थेची मदत घेतली जाणार आहे. डिझाईनमध्ये काही बदल करून या प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंट राज्य सरकारला सादर केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार भवनचा आकार हा लिली फुलाचा असून उलट्या स्वरुपात असणार आहे. या भवनात तीन मजले असतील आणि दोन गॅलरींचाही समावेश असेल. पहिली गॅलरीची ऊंची ८० मीटर असेल. तर दुसरी गॅलरीची ऊंची २५० मीटर असेल. या गॅलरीतून संपूर्ण शहर दिसेल.