आंध्र प्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांची आत्महत्या, फर्निचर चोरीचा होता आरोप

1246

आंध्र प्रदेशचे माजी विधानसभा अध्यक्ष शिवा प्रसाद यांनी सोमवारी आत्महत्या केली. शिवा प्रसाद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते.

शिवा प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. खुद्द शिवा प्रसाद यांच्यावर विधानसभेचे फर्नीचर चोरल्याचा आरोप होता. शिवा प्रसाद यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल केले.  तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

आंध्रचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी प्रसाद यांच्या मृत्यूबद्दक शोक व्यक्त केला आहे. तर तेलुगु देशम पक्षाचे खासदार केसिनेनी नानी यांनी प्रसाद यांचा खून झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या हत्येमागे मुख्यमंत्री जगन रेड्डी असल्याचा घाणाघातही त्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या