आंध्र प्रदेशात शाळा उघडताच 27 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशमध्ये 27 शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून तातडीने शाळा बंद करण्यात आली आहे.

आंध्र सरकारने 5 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोनाचे संकट वाढल्याने सकारने 2 नोव्हेंबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. विजयनगर जिल्ह्यात दोन जिल्हा परिषद शाळेतील 9 वी आणि 10 वीच्या 27 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे विद्यार्थी आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी शाळेत येत होतो. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पालक चिंतेत आहेत आणि त्यांनी शिक्षक आणि अधिकार्‍यांना धारेवर धरले आहे. पण विद्यार्थ्यांना बाहेरून कोरोनाची लागण झाल्याचा दावा अधिकार्‍यांनी केला आहे. शाळेत सर्व प्रकारची काळजी घेतली जात होती असे अधिकार्‍यांनी म्हटले आहे. तसेच शाळेत येण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी केली जात होतीअसेही अधिकार्‍यांनी नमूद केले आहे.