
भाजपला मत दिलात तर भविष्यात दारू 50 रुपये क्वार्टरने देऊ असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सोमू विरराजू यांनी दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
Cast one crore votes to Bharatiya Janata Party…we will provide liquor for just Rs 70. If we have more revenue left, then, will provide liquor for just Rs 50: Andhra Pradesh BJP president Somu Veerraju in Vijayawada yesterday pic.twitter.com/U9F1V8vly7
— ANI (@ANI) December 29, 2021
मंगळवारी विजयवाडा येथील एका सभेत बोलताना विरराजू यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘सध्या राज्यात खराब दर्जाची दारू विकली जात आहे. राज्यातील अनेक राज्यकर्त्या नेत्यांचेच दारुचे कारखाने असून ते हलक्या दर्जाची दारू बनवतात व जास्त किमतीत विकतात. हा मुद्दा गंभीर आहे. राज्यात चांगले व प्रसिद्ध दारुचे ब्रँड मिळत नाहीत. राज्यात दारु पिणारे जवळपास एक कोटी लोकं आहेत. त्या एक कोटी लोकांनी जर भाजपला मत दिले तर भविष्यात आम्ही ब्रँडेड दारू 70 रुपये क्वार्टरने विकू व त्याउपर जर आमचा महसूल वाढला तर आम्ही ती दारू 50 रुपयांपर्यंतही देऊ. असे विरराजू यांनी या सभेत सांगितले.




























































