
अँड्रॉइडच्या सुरक्षिततेसंदर्भात नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात येतात. मात्र अधिकृतपणे कोणत्याही कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अद्याप तसे बोललेले नाहीत. आता अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी थेट एका लाईव्ह चॅट शोमध्ये असे म्हटले आहे की, Android डिव्हाइसमध्ये iOS पेक्षा 47 टक्के अधिक मालवेयर असतात. ते म्हणाले की अॅपल अँड्रॉइडच्या तुलनेत आपल्या डिव्हाइसच्या प्रायव्हसीवर अधिक लक्ष देतो.
टिम कुकने यांनी अँड्रॉइडची सुरक्षा कमकुवत असल्याचे सांगत म्हणाले की, अँड्रॉईडमध्ये साईडलोडींग खूप जास्त असते, तर आयओएसमध्ये तसे नाही. साईडलोडींग म्हणजे कोणत्याही डिव्हायसमध्ये थर्ड पार्टी अॅप आपोआप डाऊनलोड होणे. साधारणपणे आपण पाहिले असेल की अँड्रॉइडमध्ये अॅप एपीके फाइलद्वारे देखील इन्स्टॉल केले जातात, मात्र आयफोनमध्ये तसे नसल्याचे ते म्हणाले आहेत.
कुक पुढे म्हणाले की, अॅपल डिव्हाइससाठी फक्त एक अॅप स्टोअर आहे, तर अँड्रॉइड डिव्हाइस अॅप्ससाठी बरेच स्टोअर आहेत. आयओएस डिव्हाइसच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही अन्य अॅप स्टोअरला परवानगी देण्यात आलेली नाही आहे. याशिवाय अॅप स्टोअरवर कोणतेही अॅप पब्लिश करण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते, असेही ते म्हणाले आहेत.































































