
अंगडिया खंडणी प्रकरणातील वॉण्टेड आरोपी उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक यूपीला गेले आहे. यूपीतल्या गोमतीनगर येथे त्रिपाठी यांचे घर आहे.
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात अंगडियांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी तिघा पोलिस अधिकाऱयांविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून परिमंडळ 2 चे तत्कालीन उपायुक्त सौरभ त्रिपाठी हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत; परंतु अद्याप त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. याआधीदेखील पोलिस पथक लखनौला जाऊन आले, पण त्रिपाठी यांचे वडीलदेखील तिथून निघून गेले आहेत. दरम्यान, सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक पुन्हा यूपीला गेले आहे.

























































