
येत्या मंगळवारी असलेल्या अंगारकीनिमित्त प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची दर्शन व्यवस्था आणि सोयी-सुविधांच्या अनुषंगाने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मध्यरात्री दीड वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होईल. सोमवारी मध्यरात्री दीड ते पहाटे 3.15 वाजेपर्यंत, पहाटे 3.50 ते रात्री 9 वाजेपर्यंत आणि रात्री 9.30 ते रात्री 11.30 या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येईल. पहाटे 3.15 वाजता बाप्पाची आरती, दुपारी 12.15 वाजता नैवेद्य, सायंकाळी 7 वाजता धुपारती, रात्री 9 वाजता श्री चे नैवेद्य व आरती होईल, अशी माहिती श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने देण्यात आली.