कॉमेडी आणि इमोश्नलने भरलेला ‘अंग्रेजी मीडियम’ चा ट्रेलर प्रदर्शित

707

इरफान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट अंग्रेजी मीडियमचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यावेळी अंग्रेजी मीडियमच्या प्रवेशाचा संघर्ष थेट लंडनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात होणार आहे.

हिंदी मीडियममध्ये इंग्रजी माध्यमात आपल्या मुलीला घालण्यासाठी एका दाम्पत्याची धडपड दाखवली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. आता अंग्रेजी मीडियमची झेप थेट लंडनमध्ये आहे. कारण इरफान खानच्या मुलीला लंडनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे. आणि आता पैशांचाही संघर्ष आहे.

इरफान खान राजस्थानी व्यक्तीरेखेत आहे. त्यासोबत आहे दीपक डोब्रियाल, राधिका मदन, डिंपल कापडिया आणि करीना कपूर. थोड्याच वेळात ट्रेलरल अडीच लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंटमधूनही प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या