जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशी अहवालानंतर कारवाई, अनिल देशमुख यांची माहिती

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेचा मूळ उद्देश साध्य झालेला नाही. त्यावर कॅगने त्याच अहवालाच्या आधारे या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, या योजनेचा केवळ बोलबाला करण्यात आला होता. या योजनेचा चौकशी अहवाल आल्यावर पुढील कारवाई होईल.

आपली प्रतिक्रिया द्या