अनिल गावंडे यांचा शिवसेनेत प्रवेश

2720

अकोला जिल्ह्यातील अनिल गावंडे यांनी शुक्रवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केले.  अनिल गावंडे यांनी लोकजागर मंच या संघटनेची स्थापना केली असून या संघटनेद्वारे ते शेतकरी आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहे.

लोकजागर मंचाच्या वतीने अकोला जिल्ह्यात एक दूध डेअरी उभी करण्यात आली आहे. या डेअरीची क्षमता 50 हजार लिटर प्रति दिन  इतकी असून इथे महिला बचत गटाच्या माध्यमातून चिक्की, मशरूम पापड, घरगुती मसाले याची निर्मितीही सुरू करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील गावांमधील खड्डे बुजवण्यासाठी गावंडे यांनी खड्डे बुजाव- जान बचाव ही  लोक चळवळही सुरू केली आहे. नववर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याऐवजी दूध पिऊन करावं असं आवाहन करत गावंडे यांनी दूध पार्टीचे आयोजन करायला सुरुवात केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या