जगाच्या पाठीवर – जगातील मोठे रेन हार्वेस्टिंग

>> अनिल गोडबोले

पाणीटंचाईवर पावसाचे पाणी साठवून ठेवणे याला ‘रेन हार्वेस्टिंग’ म्हणतात. ज्या प्रदेशात पाण्याचे साठे कमी असतात, त्या प्रदेशांनी पावसाचे पाणी साठवून ठेवले तर त्याचा फायदा वर्षभर पाणी मिळण्यासाठी होतो. जगभर अशा पद्धतीने पाणी साठवून पाणी समस्या काही प्रमाणात कमी केली जाते.

जगातले असे मोठे रेन हार्वेस्टिंग भारतात कर्नाटक या राज्यात होते. तसेच दिल्ली विमानतळाच्या इमारती खाली असे लाखो लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे.

असे गावोगावी पाण्याचे साठे पावसाळय़ात करून ठेवले तर पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होईल.

नुसते पाणी साठवून उपयोग नाही, तर ते जपून वापरणे तितकेच आवश्यक आहे. पाणी जपून वापरले, वाया घालवले नाही, तर पाण्याचे दुर्भिक्ष कमी व्हायला मदत होईल.