आंजर्लेत लसीकरण केंद्र सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविडचा प्रादुर्भाव दापोली तालुक्यात वाढत असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी दापोली दौऱ्यावर आलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा सभेनंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशीष मरकड यांना आंजर्ले येथील प्राथमिक शाळेत कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते. यामुळे आंजर्ले येथे गुरुवारपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी आंजर्ले येथे या लसीकरण केंद्राचे उद्घाटन आंजर्ले सरपंच स्वप्नाली पालशेतकर, उपसरपंच मंगेश महाडिक, संदेश देवकर, आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोहिते, डॉ. राठोड, सर्व आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य यांचे उपस्थितीत करण्यात आले.