
चंदिगडमधील आयडीएफसी फर्स्ट बँकेत 590 कोटींचा घोटाळा उघडकीस येऊन महिना उलटत नाही तोच कोटक महिंद्रा बँकेत तब्बल 150 कोटी रुपयांचा एफडी घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. हा घोटाळा हरयाणातील पंचकुला महानगरपालिकेतील मुदत ठेवमध्ये झाला आहे. महापालिकेने 58 कोटींच्या एका एफडीची मुदत संपल्यानंतर रक्कम खात्यात जमा करण्याची विनंती केल्यानंतर हा घोटाळा समोर आला आहे. पालिकेने मुदत ठेव म्हणून जमा केलेली रक्कम बनावट खात्यांत वळवण्यात आल्याचा आरोप आहे. पंचकुला पालिकेने या प्रकरणाची तक्रार राज्य दक्षता विभागाकडे करण्यात आली आहे. तसेच बँकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



























































