अँटीरिअर क्रूसिएट लिगामेटनंतर खेळाडूंनी घ्यायची काळजी

डॉ. मनू बोरा 

टीबिया (पायाच्या नडगीचे हाड), फिमर (मांडीचे हाड) तसेच पटेला (गुडघ्याची वाटी) या तीन घटकांचा मिळून गुडघा तयार होतो. गुडघ्याच्या आतील बाजूस असणारे अँटिरिअर क्रूसिएट लिगामेंट (एसीएल) हे मुख्य अस्थिबंध आहे. गुडघ्याच्या सांध्याला आधार देणारा हा अस्थिबंध गुडघ्याचा मुख्य अस्थिबंध समजला जातो. हा अस्थिबंध नडगीची मांडीपर्यंत पुढच्या दिशेला होणारी अतिरिक्त हालचाल नियंत्रित करतो. तसेच सर्व बाजूंनी गुडघ्याला आधार देतो. या अस्थिबंधाला खेळताना इजा होऊ शकते.

काय आहेत कारणे?

उडी मारल्यावर अयोग्य पद्धतीने खाली जमिनीवर येणे, गुडघ्यावर थेट मार लागणे ही अँटिरिअर क्रूसिएट लिगामेंटची काही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे अँटिरिअर क्रूसिएट लिगामेंटला चीर पडण्याची शक्यता असते. खेळाडूंच्या बाबतीत या अस्थिबंधाची कार्यक्षमता आवश्यक असतेच. म्हणून अनेक वेळा खेळाडूंना शस्त्रक्रिया करावी लागते. स्पर्धेमध्ये पूर्वीसारखी गुडघ्यांची क्षमता टिकून राहण्यासाठी खेळाडू शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतात. अनेक खेळाडूंना अँटिरिअर क्रूसिएट लिगामेंटच्या इजेमुळे आपल्या खेळाचे सादरीकरण आणि त्यातली गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम आणि फरक दिसून येतो.

एसीएलची लक्षणे कोणती?

एसीएल हालचाल करताना गुडघ्यातून एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. तसेच चालताना तोल गेल्यासारखे वाटते. एसीएलला इजा झाल्यास लक्षणीय सूज आणि वेदना जाणवतात तसेच संबंधित व्यक्तींना पायावर येणारा शारीरिक भार सहन करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे हालचालींवर निर्बंध येणे, स्नायू अशक्त होणे, कार्य करण्याची क्षमता कमी झाल्याचे दिसून येते.

त्याचे निदान कसे होते?

वैद्यकीय पद्धतीने गुडघ्याचे परीक्षण केले जाते. त्यानंतर डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट रुग्णामध्ये एसीएलला इजा झाल्याची काही लक्षणे आढळतात का, याचे परीक्षण करतात. त्याकरिता सुरुवातीला एक्स-रे काढला जातो. एसीएलच्या निदानासाठी विशिष्ट चाचण्या उपलब्ध आहेत. यामध्ये एसीएलवर ताण दिला जातो. त्यातून एसीएलला दुखापत झाली आहे का किंवा चीर गेली आहे का, हे लक्षात येते. काही रुग्णांना एसीएलला दुखापत झाल्यास निदानासाठी एमआरआय करण्याचा सल्लाही दिला जातो. त्यामुळे एसीएलच्या दुखापतीबरोबर आणखी काही हानी असल्यास त्याचेही निदान होते.

त्याचा उपचार कसा केला जातो?

एसीएलला झालेली दुखापत शस्त्रक्रियेविना किंवा शस्त्रक्रिया करून बरी करता येते. हा निर्णय केवळ तुमचे अस्थिविकार तज्ञ घेऊ शकतात. एसीएल शस्त्रक्रियेला एसीएलची पुनर्रचना (एसीएल रिकन्स्ट्रक्शन) असे म्हणतात. एकदा एसीएलला इजा झाल्यावर त्याची दुरुस्ती करणे क्वचितच शक्य आहे. त्यामुळे एसीएलची पुनर्रचना करावी लागते. इजा झालेल्या स्नायुबंधाच्या ठिकाणी पर्यायी स्नायुबंध बसवला जातो. ओघाने अस्थिबंधाची दुखापत पूर्वस्थितीत यायला मदत होते.

शस्त्रक्रियेपूर्वी पेनकिलर्स, सूज कमी करण्यासाठी काही व्यायाम, फिजिओथेरेपीसारखे उपचारही लिहून दिले जातात. शस्त्रक्रिया कमी क्लिष्ट आहे आणि रुग्णांना चांगले परिणाम दिसून येत असल्याचे संशोधना अंती सिद्ध झाले आहे. मेनिस्कस आणि कूर्चेला कार्टिलेजला जखम असल्यास आणि ताबडतोब बरी करणे आवश्यक असल्यास शस्त्रक्रियेच्या रुग्णांमध्ये नॉन-ऑपरेटिव्ह उपचार वगळले जाऊ शकतात.

दुखापत पुन्हा उलटण्याची संभाव्यता कमी करणे, शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन

शस्त्रक्रियेनंतर एसीएलचे पुनर्वसन अतिशय गरजेचे आहे, परंतु बहुतांश घटनांमध्ये त्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते. शस्त्रक्रियेनंतर जर योग्य आणि उत्तम परिणाम हवे असतील तर अनुभवी आणि प्रशिक्षित फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.  शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन करताना संपूर्ण गुडघा पुनर्स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. गुडघ्याचे अस्थिबंध स्थिर करणे, स्नायूंची ताकद वाढवणे, सांध्याची हालचाल सुधारणे इ. या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये गुडघ्याचा तोल सुधारणे, अंतस्थ संवेदना सुधारणे, चपळता परत आणणे यांचाही समावेश असतो. इंटर्नल ब्रेस प्रक्रियादेखील प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. ती संपूर्ण गुडघ्यामध्ये विविध प्रकारे लागू केली जाते.

15 वर्षांच्या सरावात आम्ही असे निरीक्षण केले की, क्रीडा दुखापतींसह माझ्याकडे आलेल्या बहुतेक खेळाडूंना एसीएल टिअर असतात आणि त्यांना सतावणारा मुख्य घटक म्हणजे शस्त्रक्रियेनंतर पुर्नप्राप्तीची प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारा वेळ. याची त्यांना काळजी वाटते. बरे होण्याच्या प्रतीक्षेत त्यांच्या स्पर्धा तसेच मैदानावर जाणे मुकावे लागेल की काय, अशी शंका त्यांना वाटते. आम्ही अशा अनेक केसेसवर वेगवेगळय़ा तंत्राने शस्त्रक्रिया केली आहे आणि रुग्णांच्या जलद पुनर्वसनासाठी, लवकरच मैदानावर परतण्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणून एसीएल शस्त्रक्रियेसाठी अंतर्गत ब्रेस तंत्र फायदेशीर ठरत आहे. माझ्या सरावात इंटर्नल ब्रेस तंत्राचा परिचय दिल्यानंतर मला मिळू लागलेला सकारात्मक प्रतिसाद तसेच रुग्णांचा कल या दिशेने वाढत आहे.

 (लेखक नेक्सस डे सर्जरी सेंटर, मुंबई येथे प्रख्यात गुडघे आणि एसीएल शस्त्रक्रिया तज्ञ आहेत)