नेहमी तरुण दिसण्यासाठी करा ‘या’ पाच गोष्टी…

वय वाढायला लागल्यावर त्वचेची चमक कमी होते तसेच चेहऱ्यावर सुरकुत्याही येतात. काही साध्या, सोप्या टिप्स वापरून वाढत्या वयातही त्वचेचा तजेला कायम राखता येतो. तसेच चेहऱ्याची चमक कायम राहत असल्याने चेहऱ्यावरून वाढते वय दिसत नाही. त्यामुळे नेहमी तरुण दिसण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा उजळ बनवण्यासाठी काही साध्या सोप्या टिप्स वापराव्यात.

बदलती जीवनशैली, हवामान आणि ताणतणावामुळे सध्या वयाची तिशी ओलांडल्यावर चेहऱ्याची चमक कमी होते. तर चाळिशीनंतर चेहऱ्यावर डाग पडून सुरुकुत्या येण्यास सुरुवात होते. त्यामुळे काही सवयी बदलण्याची गरज आहे. त्वचेची चमक कायम राहण्यासाठी तळपत्या किंवा जास्त उन्हात जाणे टाळण्याची गरज आहे. उन्हामुळे चेहऱ्यावर डाग पडण्याची शक्यता असते. उन्हात जायचे असल्यास एखादी सनस्क्रीन वापरावी. त्याचप्रमाणे शरीराला विटामीन ई आणि सी मुबलक प्रमाणात मिळतील, असा आहार घ्यावा. या घटकांमुळे त्वचेच्या पेशींची हानी टाळता येते. त्यामुळे त्वचेची कोमलता कायम राहते. सुखा मेवा, दुधाचे पदार्थ, हिरव्या भाज्या, किवी, लिंबू यांचा आहारात समावेश केल्यास त्वचेला फायदा होतो.

झोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. त्यामुळे त्वचेच्या कोशिका मोकळ्या होऊन विषारी घटक त्वचेबाहेर टाकण्यास मदत होते. चेहऱ्य़ाला मेकअप केला असल्यास तो झोपण्यापूर्वी काळजीपूर्वक काढावा. चेहरा पूर्ण स्वच्छ करूनच झोपण्यास जावे. त्यामुळे चोहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते. आंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी चेहऱ्याला मॉइस्चरायजर लावावे. ग्लिसरीन, मिनरल ऑइल आणि हाइलूरोनिक अॅसिड यांचा मॉइस्चराइजरमध्ये समावेश असावा. त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसाला कमीतकमी आठ ग्लास पाणी प्यावे. योग्य प्रमाणात पाणी घेतल्यास चेहऱ्याची कोमलता टिकून राहते. त्यामुळे जीवनशैलीत थोडेस बदल करून त्वचेचा तजेला टिकवता येतो.

आपली प्रतिक्रिया द्या