
अँटिलिया स्फोटक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज एनआयएला झटका दिला आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासाठी सीमकार्ड खरेदी केल्याच्या आरोपाखाली बुकी नरेश गौर यांना अटक झाली होती. याप्रकरणी एनआयए कोर्टाने गौर यांना जामीन मंजूर केला आहे. त्याविरोधात एनआयएने उच्च न्यायालयात आपील केले होते, मात्र न्यायालयाने एनआयए कोर्टाचा निर्णय योग्य असल्याचे सांगत आज एनआयएचे अपील फेटाळले आहे. नरेश गौर यांच्या जामिनाविरोधात एनआयएने दाखल केलेल्या अपिलावर आज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. तेव्हा गौर यांना एनआयए न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्याची मागणी एनआयएने केली होती.




























































