‘मीसुद्धा स्वमूत्रप्राशन केले आहे’, परेश रावल यांच्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनेची कबुली

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वीच एक धक्कादायक खुसाला केला होता. एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्यांनी स्वत:चीच लघवी पिण्याचे सांगितले होते. परेश रावल यांनी केलेल्या या विधानाने सर्वांना धक्का बसला होता. मात्र आता त्यांच्या या विधानानंतर एका अभिनेत्रीनेही स्वत: ची लघवी पिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

परेश रावल यांच्यानंतर स्वत:चीच लघवी पिण्याचा खुलासा करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती अनु अग्रवाल आहे. अनु अग्रवाल यांनी इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. परेश रावलप्रमाणे तिने देखील लघवी पिण्याचे कबूल करत याचे फायदे देखील सांगितले आहेत. स्वत: ची लघवी पिणे ही एक प्राचीन उपचार पद्धती असल्याचे तिने सांगितले.

स्वत:ची लघवी पिणे हे योगासन आहे. मी देखील प्यायले आहे. ही एक अतिशय महत्त्वाची प्रथा आहे. मात्र आपल्याला संपूर्ण लघवी प्यायची नाहीए. स्वत:ची लघवी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लघवी प्यायल्याने, त्वचेला सुरकुत्या येत नाहीत, तसेच इतर शारिरीक आजारही कमी होण्याची शक्यता असते, असे तिने सांगितले.

… तेव्हा मी 15 दिवस स्वत:चीच लघवी बिअर सारखे प्यायलो – परेश रावल