हनुमान पहिले अंतराळवीर; अनुराग यांचा नवा धडा

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी हनुमानजी हे पहिले अंतराळवीर होते, विधान केले. आता त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. हिमाचल प्रदेशातील एका कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.  अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती कोण होते, असा प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारला. यावर विद्यार्थ्यांनी नील आर्मस्ट्रॉंग असे उत्तर दिले. यावर मात्र मला वाटते हनुमान हे अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती होते, असे अनुराग ठाकूर म्हणाले. अनुराग ठाकूर यांच्या विधानावर डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांनी एक्सवरील पोस्टद्वारे टीका केली आहे. अनुराग ठाकूर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चंद्रावर प्रथम कोणी पाऊल ठेवले असे विचारणे आणि नील आर्मस्ट्रॉंग ही ती व्यक्ती नसून हनुमान होते असे सांगणे किंवा तसा आग्रह धरणे हे चुकीचे आहे, असे खासदार कनिमोळी म्हणाल्या.