राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अणुशक्तीनगर विधासभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येणार आहेत.
विभाग युवा अधिकारीपदी श्रीकांत तांदळे यांची तर उपविभाग युवा अधिकारीपदी प्रवीण कुंभार (शाखा क्र. 143, 144), मोज धोत्रे (शाखा क्र. 148, 147), वैभव जाधव (शाखा क्र. 146, 145) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विधानसभा समन्वयकपदी विराग पावसकर, विजय भोईर, निजामउद्दीन शेख, अमोल कोकणे, बकप्पा भागोडी यांच्या तर विधानसभा चिटणीसपदी नवीन पवार, हितेश सिंग, आकाश पवार, कल्पेश देशमुख यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. उप विधानसभा समन्वयकपदी धनाजी नरळे, तेजेश भोगले, साहील शेख, विशाल क्षिरसागर, स्वप्नील बनकर यांच्या तर उप विधानसभा चिटणीसपदी अक्षय गडदे, पृष्णा मूर्ती, प्रथमेश पाटील यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवा अधिकारीपदी अक्षय साळुंखे (शाखा क्र. 143), सागर पाटील (शाखा क्र. 144), शंकर तिरसुंगे (शाखा क्र. 145), सचिन राऊत (146), प्रशांत जगताप (शाखा क्र. 147), जयवंत खरात (शाखा क्र. 148) यांच्या तर शाखा समन्वयकपदी स्वप्नील भादवनकर (शाखा क्र. 143), ईश्वर वाक्षे (शाखा क्र. 144), सर्वनल देवराज (शाखा क्र. 145), विशाल वाघेला (शाखा क्र. 146), सागर कामत (शाखा क्र. 147), प्रणय म्हात्रे (शाखा क्र. 148) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.






















































