Punjab Election ‘म्हणून पंजाबमधील ‘त्या’ घटनेवर मौन साधले, अन्यथा…’, मोदींनी सांगितलं कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील फिरोजपूर येथे सभेसाठी जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा एका पुलावर जवळपास 20 मिनिटं खोळंबून होता. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही एक मोठी त्रुटी होती आणि त्या दिवशी नेमकं काय झालं यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा केला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी त्यांनी पंजाबमध्ये घडलेल्या त्या घटनेवर आपण मौन का साधले याबाबत विधान केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीला सर्वोच्च न्यायालयाने गंभीरतने घेतले असून या प्रकरणाच्या तपासासाठी निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने देखील हे प्रकरण गंभीरतने घेतले आहे. तसेच त्या क्षणी मी कोणतेही विधान केले असते तर संपूर्ण कारवाईवर त्याचा प्रभाव पडला असता आणि हे योग्य नाही. जे काही असेल ते सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या अहवालातून बाहेर येईलच. आपण वाट पाहायला हवी.’

मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंजाबमध्ये एका पुलावर जवळपास 20 मिनिटं ताफा खोळंबून होता यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पंतप्रधानांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना ‘मी जिवंत परत जातोय यासाठी धन्यवाद’, असा संदेशही पाठवला होता. यावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी एक जुना किस्साही सांगितला.

संपूर्ण हिंदुस्थान आणि पंजाबशीही माझे खास नाते आहे. मी पंजाबमध्येही राहिलो असून तिथे पक्षाचे काम केले आहे. पंजाबच्या लोकांचे शौर्य पाहिले आहे. त्यावेळी पंजाबमध्ये दहशतवादामुळे परिस्थिती खराब होती. सायंकाळी कोणी घराच्या बाहेर पाऊल ठेवत नव्हते. मी मोगा किंवा तरंतामध्ये होतो. मला पुढील ठिकाणावर जायचे होते, पण उशिर झालेला. मी आणि ड्रायव्हर असे दोघेच गाडीत होतो आणि गाडी खराब झाली. धक्का दिल्यानंतरही ती सुरू झाली नाही. बाजूच्या शेतात 2-3 लोक होते आणि आमची परिस्थिती पाहून ते आले. त्यांनीही धक्का दिला, पण गाडी सुरू होईना. जवळ कोणता मॅकेनिकही नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

गाडी तिथेच सोडून त्यांनी आम्हाला आमच्यासोबत चला असा इशारा केला. रात्रीच्या वेळी इथे थांबणे योग्य नसल्याने त्यांनी आम्हाला जवळच्या शेतात असणाऱ्या झोपडीत येण्याचा आणि जेवण करण्याचा आग्रह केला. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याचे कळाल्यानंतरही त्यांनी माझे आदततिथ्य केले. जेवणाची आणि झोपण्याचीही व्यवस्था केली. तसेच सकाळी मुलाला पाठवून एका मॅकेनिकलाही बोलावले आणि गाडी निट करून घेतली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)