आंध्र प्रदेशमध्ये दिशा कायदा पास, बलात्काऱ्यांना 21 दिवसात लटकवणार

533

हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला जाळण्यात आले. या घटनेने देशभरात जनक्षोम उसळला आहे. याचपार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा पास केला आहे. याअंतर्गत बलात्काराच्या घटनेनंतर 21 दिवसात  दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाणार आहे.

बुधवारी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यात  एफआयआर दाखल झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत खटल्याच्या सुनावणीबरोबरच दोषींच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.  गुरुवारी राज्य सरकार विधानसभेत हे विधेयक सादर करणार आहे. या विधेयकात भारतीय दंड संहीता 354 मध्ये संशोधनात्मक बदल करण्यात आले असून नवीन कलम 354 (ई) तयार करण्यात आले आहे.

 सध्या हिंदुस्थानमध्ये बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचे तरतूद नाही. पण आंध्र प्रदेशचे दिशा कायदा विधेयक  पास झाल्यानंतर आंध्र प्रदेश हे बलात्काऱ्यांना फाशी देणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी तेलंगाणात डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला जाळण्यात आले. या घटनेनंतर दिशा कायद्याबरोबरच अन्य काही कायदे राज्यात लागू करण्यात आले आहेत. यात महिला व बालकांवरील अत्याचारांचे खटले विशेष न्यायालयात चालवण्यात येण्याची तरतूद आहे.

21 दिवसात मिळणार शिक्षा

आंध्र प्रदेश दिशा अधिनियमांतर्गत बलात्कारासाठी मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली आहे. पोलिसांना अशा घटनांच्या प्रकरणांचा तपास अहवाल सात दिवसांच्या आत पूर्ण करून 14 दिवसांत न्यायालयाला द्यावा लागणार आहे. जेणेकरून 21 दिवसांच्या आत दोषींना फाशीची शिक्षा मिळेल. अशी तरतूद  दिशा कायदा विधेयकात करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या