डॉ. अब्दुल कलाम यांच्यावर बायोपिक

739

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर बायोपिक येणार आहे. यामध्ये डॉ. कलाम यांची भूमिका अभिनेता परेश रावल साकारणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये परेश रावल काम करणार अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी होती. मात्र या सिनेमाचे पुढे काय झाले ते समजले नाही. त्यातच रावल यांनी अब्दुल कलाम यांच्या बायोपिकमध्ये काम करणार असल्याचे सांगितले आहे. रावल यांनी ट्विट केलंय की, माझ्या मते अब्दुल कलाम हे संत होते. मला कलाम यांची भूमिका साकारायला मिळाली हे माझे भाग्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या