एपीएमसीच्या व्यापाऱ्याला कोरोनाची बाधा, नवी मुंबईत तीन नवे रुग्ण सापडले

1226

नवी मुंबई शहरात कोरोनाचे आज तीन नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या थेट 31 वर गेली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील एका व्यापाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे एपीएमसीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शहरात आज आढळून आलेल्या तीन रुग्णांमध्ये कोपरखैरणे येथील सेक्टर 19 मधील एकाच घरात राहणाऱ्या दोघांचा समावेश आहे. हे सर्व कुटुंब वाशी येथील मौलनाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे घरातील सात लोकांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये आढळून आलेला कोरोना पॉझिटिव्ह व्यापारी हा मुंबई येथील रहिवासी आहे. त्याच्या संपर्कात किती जण आले, याचा महापालिका प्रशासन शोध घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या