
सामना प्रतिनिधी । न्यूयॉर्क
येत्या 30 ऑक्टोबरला न्यूयॉर्कमध्ये होणार्या एका ईव्हेंटमध्ये ऍपल आतापर्यंतचा सर्वात छोटा ‘आयपॅड प्रो’ (iPad Pro) लॉन्च करणार आहे. न्यूयॉर्कमधील ब्रुकलीन येथे हा ईव्हेंट होणार असून ‘देअर इज मोर इन द मेकिंग’ अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. ‘आयपॅड प्रो’विषयी अद्याप ऍपलने कोणताच खुलासा केला नसला तरी या आयपॅडमधील फिचर्सची माहिती विविध माध्यमांतून समोर आली आहे. आयपॅड प्रोची रुंदी 5.9 mm एवढी असणार असून ऍपल दोन मॉडेल लॉन्च करणार आहे. ट्विटर अकाऊंट कॉईनकॉईनने ही माहिती जाहीर केली असून हा आतापर्यंतच सर्वात छोटा आयपॅड असणार आहे. ऍपल ‘आयपॅड प्रो’चे 10.5 इंच आणि 12.9 इंच असे दोन मॉडेल लॉन्च होणार आहेत. आयफोनप्रमाणेच या आयपॅडमध्ये फेस आयडी फिचर असण्याची शक्यता आहे.





























































