
रिलायन्स फाऊंडेशनने शिष्यवृत्तीसाठी अर्जप्रक्रिया सुरू केली आहे. अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्ती पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्पृष्टतेसाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार आहे. यासाठी कोणत्याही पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र आहेत. तसेच पोस्टग्रॅज्युएट शिष्यवृत्तीद्वारे अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि जीवनविज्ञान या क्षेत्रांतील 100 प्रतिभावान पदव्युत्तर विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रत्येकी 6 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य केले जाईल. अधिक माहितीसाठी scholarships.reliancefoundation.org या संकेतस्थळाला भेट द्या. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर आहे.