सिंधुदुर्गात नगरपंचायत , नगरपरिषदांसाठी 241 उमेदवारांचे अर्ज दाखल; सर्व उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपंचायत, नगरपरिषदेची रणधुमाळी सुरु झाली आहे. रविवारी 16 नोव्हेंबर रोजी सावंतवाडी , मालवण , वेंगुर्ले , कणकवली या चारही ठिकाणी सदस्य पदासाठी 158 उमेदवारी अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे सातव्या दिवशी 16 नोव्हेंबर अखेरपर्यंत सदस्य पदासाठी 224 उमेदवारी अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी 17 उमेदवारी दाखल झाले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेसाठी 16 नोव्हेंबर अखेरपर्यंत सदस्य पदासाठी 40 तर नगराध्यक्षपदासाठी 5 , मालवण नगरपरिषदेसाठी सदस्य पदासाठी 42 व नगराध्यक्ष पदासाठी 3 , वेंगुर्ले नगरपरिषद सदस्यपदासाठी 72 तर नगराध्यक्ष पदासाठी 5, कणकवली नगरपंचायतसाठी सदस्य पदासाठी 4 , नगराध्यक्ष पदासाठी 1 अशी नामनिर्देशन पत्रे दाखल झालेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 3 नगरपरिषद , 1 नगरपंचायत या ठिकाणच्या निवडणूकीतील 224सदस्य पदासाठी व 17 नगराध्यक्ष पदासाठी 241 नामर्निदेशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.