26 कोटी 10 लाख 97 हजार 739 रुपयांचे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 2024-25चे 26 कोटी 10 लाख 97 हजार 739 रुपयांचे मूळ अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मांडले. आजच्या विशेष सभेत या मूळ अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकीय कारभार सुरु आहे. प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आजच्या विशेष सभेत जिल्हा परिषदेचे 2023-24चे अंतिम सुधारीत अंदाजपत्रक आणि 2024-25चे मूळ अंदाजपत्रक मांडले. जिल्हा परिषदेच्या 2023-24 चा एकत्रित महसूल, भांडवल व वित्तप्रेषणासह 40 कोटी 81 लाख 85 हजार 801 रुपयांचे अंतिम सुधारीत अंदाजपत्रक मांडले. 2024-25 च्या एकत्रित महसूल, भांडवल व वित्तप्रेषणासह 26 कोटी 10 लाख 97 हजार 739 रुपयांचे मूळ अंदाजपत्रक मांडले. सामान्य प्रशासनासाठी 27 लाख 72 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठासाठी 3 कोटी 80 लाख 48 हजार 260 रुपयांची तरतूद करण्यात आली. समाजकल्याण विभागासाठी 2 कोटी 4 लाख 90 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली.

दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी 84 लाख 1 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. महिला व बालकल्याण विभागासाठी 1 कोटी 2 लाख 45 हजार 100 रुपयांची तरतूद करण्यात आली. शिक्षण विभागासाठी 1 कोटी 10 लाख 94 हजार 500 रुपयांची तरतूद करण्यात आली. बांधकाम विभागासाठी 2 कोटी 55 लाख 31 हजार 500 रुपयांची तरतूद करण्यात आली. पाटबंधारे विभागसाठी 2 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. आरोग्य विभागासाठी 41 लाख 40 हजार 800 रुपयांची तरतूद करण्यात आली. शेती विभागसाठी 61 लाख 1 हजार 100 रुपयांची तरतूद करण्यात आली. पशूसंवर्धन विभागासाठी 42 लाख 100 रुपयांची तरतूद करण्यात आली. सामुहिक विकासासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.