लहान मुलांसाठी अॅप्टाग्रोची न्यूट्रिशन ड्रिंक पावडर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या लहान मुलांना योग्य तो आहार देणे हे आईसाठी मोठे आव्हान असते. कारण त्यांना मिळणारा आहार आरोग्यदायी असून चालत नाही. तर तो मुलांच्या आवडीचा आणि तितकाच चविष्ट असावा लागतो. याचसाठी डॉडेन इंडिया या कंपनीने लहान मुलांचे पोषण चांगले व्हावे यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या कंपनीने लहान मुलांना आवडणारी अॅप्टाग्रो न्यूट्रिशन ड्रिंक पावडर बाजारात आणली आहे. 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी ही पावडर उपयुक्त असणार आहे.

मुलांच्या सर्वांगिण विकासाच्या गरजा जाणून घेउन त्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉडेन इंडियाने आपले पहिले उत्पादन अॅप्टा ग्रो (AptaGrow ग्रोथ चक्र) बाजारात आणले आहे. AptaGrow मध्ये 37 वेगवेगळ्या पोषक तत्वांचा समावेश आहे. यामध्ये. उंची वाढण्यासाठी अॅप्टाग्रोमध्ये 100 टक्के प्रोटिन, कॅल्शियम, तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन ए, बी,डी आणि मेंदूचा विकास होण्यासाठी लोह, फॉलिक अॅसिड, लोह या घटकांचा समावेश आहे. त्यामुळे या पेयामुळे आता मुलांची योग्य वाढ होणे तसेच त्याना आहाराद्वारे योग्य पोषण मिळणार आहे. अॅप्टाग्रो हे चॉकलेट आणि वॅनिला अश्या दोन फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे.