शेवंता करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

सामना ऑनलाईन । मुंबई

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर सध्या घराघरातील एक चर्चेचे नाव झाले आहे. मालिकेत शेवंताची एन्ट्री झाली आणि अनेक तरुण मंडळी तिच्या किलर लूकच्या प्रेमात पडली. मालिकेतील तिची भूमिका गाजत असतानाच अपूर्वाला बॉलिवूडची देखील लॉटरी लागली आहे. अपूर्वाने इंस्टाग्रामवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

अपूर्वा प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्प करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अक्षय खन्ना, प्रियांक शर्मा आणि युविका चौधरी हे कलाकर देखील दिसणार आहेत. प्रियांक शर्मा हा अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांचा मुलगा आहे. प्रियांकचा देखील हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटींग सध्या सुरू आहे.