
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेल्या शेवंताला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. मात्र, अपूर्वाने अचानक मालिका सोडल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अखेर अपूर्वाने सोशल मीडियावरून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
अपूर्वा म्हणाली, शेवंताची भूमिका मला खूप काही देऊन गेली. या भूमिकेसाठी मी दहा किलो वजन वाढवले. वाढलेल्या वजनामुळे निगेटिव्ह कॉमेंटला मला फेस कराव्या लागल्या. सेटवरील अगदीच नवख्या आणि ज्येष्ठ कलाकारांनी विनाकारण वाढलेल्या वजनावरून माझी खिल्ली उडवली. पुढे ती म्हणाली, ‘रात्रीस खेळ चाले‘च्या शूटिंगसाठी मला वारंवार मुंबईतून सावंतवाडीला जावे लागायचे. एक दिवस शूट करून 3-4 दिवस काहीच शूट नसायचे. असे महिन्यातून केवळ 6 ते 7 दिवस शूटिंग असायचे. त्यात माझा अमूल्य वेळ वाया जायचा. तिसऱया सीजनसाठी तुमचे केवळ 5-6 दिवस लागणार हे प्रॉडक्शन हाऊसकडून सांगितले. त्यावेळी मी मालिकेला नकार दिला होता. त्यानंतर चॅनेलने मला आणखी एक शो देण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप हे आश्वासन पाळले गेले नाही. ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेचा शेवटचा चेकदेखील अद्याप मिळालेला नाही. चॅनेलने एक पैसा बुडणार नाही असे आश्वासन दिले होते. ते सुद्धा आश्वासन पाळले गेले नाही.



























































